बेपत्ता राम डीचोलकरचा मृतदेह सापडला..!

Edited by:
Published on: December 10, 2023 17:07 PM
views 1529  views

देवगड : समुद्रात पोहण्यासाठी  गेलेल्या मृतांची संख्या आता पाच झाली असून बेपत्ता असलेला राम डिचोलकर याचा मृतदेह मिळाला आहे. शोध पथकाच्या अथक परिश्रमातून हा मृतदेह मिळण्यात यश मिळाले आहे.

यापूर्वीच पुणे चिंचवड येथील सैनिक स्कूलच्या चार विद्यार्थिनी बुडून मृत्यू पावल्या होत्या. त्यांचे मृतदेह काल मिळाले. मात्र, पाचवा राम डिचोलकर बेपत्ता होता त्याचे शवही आता मिळाले आहे. बेपत्ता असलेला राम डीचोलकर मृत अवस्थेत सापडल्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आता पाच झाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल शुक्रवारी सिंधुदूर्ग जिल्ह्यात मालवण येथे र्पटनासाठी आली होती.शुक्रवारी मालवण पाहिल्यानंतर ही सहल शनिवारी सकाळी देवगडमध्ये दाखल झाली प्रथम श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे दर्शन घेवून दुपारी देवगडमध्ये आल्यानंतर जेवण आटोपून पवनचक्की येथे गार्डनमध्ये गेले.यातील काही विद्यार्थी हे पवनचक्की येथून खाली देवगड बीच येथे उतरले यावेळी त्यांना समुद्रस्नानाचा आनंद लुटण्याचा मोह आवरला नाही यामुळे ते पाण्यात उतरले.मात्र देवगड समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद लुटत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले.ते बुडत असताना त्यांचा सहकार्‍यांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिक, जीवरक्षक यांनी धाव घेतली.त्यांना पाण्यात उतरून वाचविण्याचा शर्थीचा प्रयत्न केला यामध्ये आकाश सोमाजी तुपे(२२, रूपीनगर पुणे) याला वाचविण्यात यश आले तर प्रेरणा रमेश डोंगरे(२१, रा.घरकुल चिखली पुणे), अनिषा नितीन पवळ(१९, रा.चिखली ताम्हाण वस्ती), अंकिता राहूल गलाटे(२१, कृष्णनगर चिखली), पायल राजू बनसोडे(२१, चिखली पुणे) यांना पाण्यातुन बाहेर काढण्यात यश आले मात्र त्यांना ग्रामीण रूग्णालयात तात्काळ नेल्यानंतर वैद्यकी अधिक्षक डॉ. विटकर यांनी चारही जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.यातील एका विद्यार्थीनीला पोलिसांच्या गस्ती नौकेने पाण्यातून नौकेत घेतले व देवगड बंदरावर आणण्यात आले तेथून तिला देवगड ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

दरम्यान या घटनेची माहिती सैनिक अकॅडमीच्या शिक्षकांनी देवगड पोलिस स्टेशनला दिल्यानंतर पोलिस निरिक्षक निळकंठ बगळे, अेएस्आ एफ्.जे.आगा, बिर्जे, विशाल वैजल, म.पो.कॉ.सावंत, आचरेकर तसेच तहसिलदार आर.जे.पवार, नगराध्यक्षा साक्षी प्रभू आदी घटनास्थळी दाखल झाल्या.

तहसिलदार आर. जे. पवार यांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर घटनेची माहिती घेतली. दरम्यान देवगड येथील विष्णू धुरत, मंदार धुरत, जितेश मोहिते, अवि खडपकर आदी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेवून बुडत असणार्‍या विद्याथ्र्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. सहाजणांपैकी बेपत्ता असलेल्या डिचोलकर याचे नातेवाईक कुणकेश्वर येथे असल्याचे समजते. मात्र सांकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेवूनही तो सापडला नाही.