
सावंतवाडी : माठेवाडा येथील घरात बंद खोलीत मासे विक्रेते शैलेश विलास तारी (४५) यांचा मृतदेह आढळून आला. आज सकाळी ही घटना निदर्शनास आली. बंद दरवाजा फोडून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविला.
मृतदेहाला दोन दिवस झाल्याचा अंदाज आहे. मयत तारी हे मूळ शिरोडा येथील आहेत. आठवडाभरा पूर्वी त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेल्याचे समजते. आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविला आहे. पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, पोलीस हवालदार गुरुदास नाईक, पवन परब, महेश जाधव यांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास करीत आहेत.