
दोडामार्ग : बोडदे आंबेडकर नगर येथील नागरिकांना भर पावसात पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहे. सार्वजनिक विहीर कोसळली. मात्र, पत्रव्यवहार करून देखील शासन दुर्लक्ष करीत असल्याने आज आम्हाला पाण्यासाठी आंदोलन करावें लागत आहे. त्यामुळे आम्ही या शासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहोत. असे आंदोलनकर्ते म्हणाले. आणि जो पर्यंत आमचा प्रश्न मिटत नाही तो पर्यंत आम्ही उठणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बोडदे आंबेडकर नगर येथील सार्वजनिक विहीर एक वर्षा पूर्वी कोसळली या संदर्भात पंचायत समिती, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. विहिर बांधून देण्यासाठी तात्काळ उपायोजना करा या मागणी साठी निवेदन दिले होते. मात्र 2023 मध्ये दिलेल्या निवेदना चे या शासनाने कोणतेच गाभीर्य घेतले नाही. वारवार पत्रव्यवहार करून देखील त्या ठिकाणी लक्ष दिला नाही म्हणून आज आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी हे धरणे आंदोलन करावें लागत आहे असे ते म्हणाले. यावेळी गुरूदास जाधव, कृष्णा जाधव, हनुमंत जाधव, संतोष जाधव, सीताराम जाधव, रमेश जाधव, जगन्नाथ जाधव, जीविका जाधव, तेजा जाधव आदी महिला ग्रामस्त उपस्तित होते.
बोडदे दलित वस्तीत विकासाल खीळ
दरम्यान पंचायत समिती येथे बोडदे दलीवस्तीतील पाण्या संदर्भात आणि वाडीच्या विकासा संदर्भात आंदोलना बसलेल्या नागरिकांनी म्हटले की पाण्याचा प्रश्न झालाच पण बोडदे ग्रुपग्रामपंचायत चे सरपंच आमच्या दलित वस्तीतील विकासा संदर्भात जाणून बुझून दुर्कलश करीत आहेत. वाडीतील जाणारा रस्ता, गटारे, स्ट्रीट लाईट या सर्व गोष्टीकडे ते मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे ते आपल्या पदाचा मनमानी कारभार करत आहेत त्यामुळे आम्ही बोडदे दलित वस्तीतील सर्व ग्रामस्त त्यांच्या या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करती आहे असे ते म्हणाले.आणि सरपंचामुळे आमच्या वाडीचा विकासाला खीळ बसल्याचे ते म्हणाले.