ब्रेन डेव्हलेपमेंट स्पर्धा परिक्षेत बोडदे शाळेचे घवघवीत यश !

Edited by: संदीप देसाई
Published on: April 03, 2024 09:33 AM
views 187  views

दोडामार्ग : शैक्षणिक वर्ष 2023/24 आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा परिक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बोडदेच्या मुलांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवून मेडल मिळविली आहेत. शाळेतील 7 मुलांनी ही परिक्षा दिली होती. सर्व मुल उत्तीर्ण झाली आहेत व शाळेचा निकाल 100%लागला आहे.

         या परिक्षेत कु. तन्मय तुकाराम सावंत याने 96 /100 मिळवुन सिल्वर मेडल व अनुज रामचंद्र घाडी याने 93/100 गुण मिळवुन सिल्वर मेडल पटकावले आहे.या दोघांनी जिल्हा व राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. तसेच स्वानंदी संतोष गवस , जान्हवी रुपेश घाडी, भार्गवी रविंद्र पारधी, नकुळ एकनाथ भट, क्रीतीक नितेश पारधी चांगले गुण मिळवून यश संपादन केले आहे. 

        या प्रज्ञाशोध परिक्षेसाठी मुलांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षिका सौ. पूनम यशवंतराव खोराटे यांचे मुलांच्या पालकांनी , मुख्याध्यापक श्री. महेश नाईक, केंद्रप्रमुख श्री. सूर्यकांत नाईक यांनी कौतूक केले आहे. शाळेच्या या यशस्वी शैक्षणिक गुणवत्ता वाटचालीबद्दल सौ. साक्षी संदिप नाईक, रुपाली प्रविण गवस , सुनिल नाईक, फटी नार्वेकर, रमेश दळवी , नारायण गवस , चंद्रकांत जाधव , रमेश गवस , गुरु जाधव, महेश पारधी, श्रीकृष्ण गवस, रामचंद्र गवस तसेच मुंबई, पुणे, गोवास्थित बोडदे ग्रामस्थ, पोलीस पाटील सौ. रेखा गवस , यांनी समाधान व्यक्त केले आहे.