रक्तदाते धावले मदतीला..!

Edited by: विनायक गांवस
Published on: July 10, 2024 12:21 PM
views 276  views

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान ए पॉझिटिव्ह व बी पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या दात्यांची मागणी होती. रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सर्व रुग्णांच्या नातेवाईकांकडून बदल्यात रक्ताची मागणी रक्तपेढी अधिकारी यांच्याकडून होत होती.  रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तदाता नसेल तर रक्त पिशवी नाकारण्यात येत होती. अशावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्याशी रूग्णांच्या नातेवाईकांनी संपर्क साधला. यानंतर  सुर्याजी यांनी  तातडीने रक्तपेढीमध्ये रक्तदाते पाठवले.

शहरातील प्रथमेश सुकी, गुरूप्रसाद गवळी, शिवम सावंत, निमिष पटेकर, सागर मुंज, गोपाळ गोवेकर, सुदेश नेवगी आदींनी तातडीने रक्तपेढीत जात रक्तदान केले. रक्ताची सोय झाल्याने रुग्णांची थांबलेली  शस्त्रक्रीया करता आली. यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे रूग्णांच्या नातेवाईकांकडून ऋण व्यक्त करण्यात आले. दरम्यान, रक्तपेढीच्या कर्मचारी वर्गानेपण समाजात फिरुन रक्तदानाची जनजागृती करावी व नवे रक्तदाते मिळवण्यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरून बाहेर गावावरुन आलेल्या व तातडीची गरज असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा मानसिक त्रास कमी होईल असं मत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केल आहे.