
सावंतवाडी : गोवा-बांबुळी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रूग्णांना रक्ता अभावी जीव गमावण्याची वेळ येवू नये म्हणून सावंतवाडीमध्ये महारक्तदान शिबिर घेण्यात आल. या महा रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १०५ रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान श्रेष्ठ दान, जीवनदान असल्याचे दाखवून दिले. तर रक्तदान करण्यासाठी १४० जणांनी नोंद केली होती. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. सामाजिक बांधिलकी,युवा रक्तदाता संघटना, राजा छत्रपती शिवाजी चौक, सिंधू रक्तमित्र संघटना, राष्ट्रीय छावा संघटनेच्या माध्यमातून हे महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ कडवट शिवसैनिक अनिल परूळेकर यांच्या हस्ते झाले. काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये सामाजिक बांधिलकी, युवा रक्तदाता संघटना, राजा छत्रपती शिवाजी चौक गवळीतीठा, सिंधू रक्तमित्र संघटना, राष्ट्रीय छावा संघटनेच्या माध्यमातून हे महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी १४० रक्तदात्यानी नोंदणी केली होती. त्यामध्ये १०५ जणांनी रक्तदान केले. यशवंतराव भोसले नॉलेज सिटीच्या २८ विद्यार्थ्यांनी या रक्तदान शिबीरात सहभाग घेतला. त्याशिवाय गव्हाणकर कॉलेज, आयटीआय, आरपीडी हायस्कूल, श्री पंचम खेमराज महाविद्यालय अशा शाळांच्या विद्यार्थ्यांनी देखील रक्तदान शिबिरात भाग घेतला होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात गेल्यानंतर तिथे रक्ता अभावी रुग्णांचे हाल होत होते. यामुळे गोवा मेडिकल कॉलेजसाठी आज महा रक्तदान शिबिर घेण्यात आले. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण गेल्यानंतर रक्ता अभावी त्यांचा प्राण जाऊ नये म्हणून या संघटनांनी खबरदारी घेऊन रक्तदान करावे म्हणून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आवाहन केले होते. यामध्ये देव्या सूर्याजी, संतोष तळवणेकर, रवी जाधव ,संजय पेडणेकर आदी मान्यवरांनी सहभाग घेतला. सामाजिक कार्यर्क्ते रवी जाधव बांबुळी गोवा येथे रुग्ण घेऊन गेले होते, त्यावेळी त्यांना रक्ताची गरज भासली. त्यातून हे महा रक्तदान शिबिर झाले असल्याचे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण गोव्यात गेल्यानंतर रक्ता अभावी त्यांचा प्राण जाऊ नये म्हणून महा रक्तदान शिबिर घेण्यात आले. रवी जाधव यांनी हा विषय माझ्याकडे मांडल्यानंतर आम्ही पाच संघटनांनी एकत्र येऊन हे महा रक्तदान शिबिर आयोजित केले. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, संस्थांनी आणि रक्तदात्यांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
रक्त कमी पडू नये म्हणून संघटनांनी एकत्र येऊन दिलेले योगदान जीवनदान आहे. सैनिक पतसंस्था महाव्यवस्थापक, सिंधू रक्तमित्र संघटनेचे सुनील राऊळ म्हणाले, रक्तदान चळवळ समाजामध्ये उभी राहताना गैरसमज दूर झाले पाहिजेत. मेडिकल व्यवसायामध्ये प्रगती झाली असली तरी रक्त निर्माण करता येत नाही ते मानवाला द्यावे लागते त्यामुळे रक्त दिल्यामुळे प्राण वाचू शकतात हे फार मोठे पुण्य आहे अस मत डॉ. राजेश नवागुंळ यांनी व्यक्त केल.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक अनिल परूळेकर यांनी मनोगत व्यक्त केल मी आता ८४ वर्षाचा आहे. शिवसेनेत असताना रक्तदान शिबिरे घेतली. मी स्वतः ५८ वेळा रक्तदान केलेले आहे. रक्तदान केल्यामुळे कोणतेही आजार किंवा नुकसान होत नाही. यासाठी प्रत्येकाने माणसांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान केले पाहिजे अस मत परुळेकर यांनी व्यक्त केल. या शिबिर यशस्वीतेसाठी बबन साळगावकर, संजय पेडणेकर, रवी जाधव, बंटी माटेकर, देव्या सूर्याजी, संतोष तळवणेकर व पाचही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. तसेच गोवा मेडिकल हाॅस्पीटल बाबुंळीच्या टिमने सावंतवाडीमध्ये येवून रक्त संकलन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आयोजकांच्यावतीने बबन साळगावकर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, गोवा मेडिकल कॉलेजचे डॉ. संजय कोरगावकर, डॉ राजेश नवागुंळ, निखिल गावडे, सिंधू रक्त मित्र संघटनेचे सुनील राऊळ, युवा रक्तदाता संघटनेचे देव्या सूर्याजी, आनंद रासम, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, दिपाली भालेकर, सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव ,राजा छत्रपती शिवाजी चौकचे बंटी माटेकर, छावा संघटनेचे संतोष तळवणेकर, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर,परिट समाज अध्यक्ष दिलीप भालेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, रिक्षा संघटनेचे सुधीर पराडकर, सिंधू रक्तमित्र संघटनेचे संजय पिळणकर, अफरोज राजगुरू ,सतीश बागवे ,संदीप नाईक, शैलेश नाईक, अशोक पेडणेकर,कल्याण कदम आनंद वेंगुर्लेकर, मोहन जाधव तसेच जीएमसीचे डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.