
सिंधुदुर्ग : शिवजन्मोत्सवाचं औचित्य साधत शिवप्रेमी मित्र मंडळ आरवली टांक दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असते. यावर्षीही भव्य रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलंय. यंदा या उपक्रमाचं दुसरं वर्ष आहे. इच्छुक रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय.
गेल्या वर्षीपासून रक्तदान शिबीर घेण्यास सुरुवात केली. रविवारी 18 फेब्रुवारीला या शिबीराचं आयोजन करण्यात आलंय. सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत रक्तदान करता येणार आहे. मारुती मंदिर टांक इथं हे शिबीर होतंय. आरवली टांक इथं शिवप्रेमी मित्र मंडळाच्यावतीने शिवजन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा होतो. गेल्या 4 वर्षांपासून हे मंडळ विविध कार्यक्रम राबवतंय. याचंच औचित्य साधत हे मंडळ सामाजिक बांधिलकी जोपासतंय. त्यांच्या या उपक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊन हातभार लावू शकता. त्यासाठी इच्छुक रक्तदात्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय.
मंदार चोपडेकर : 7083640732
ओमकार धुरी : 7030992793
अण्णा चोपडेकर : 8412875609
तुषार गवंडे : 9403397791
जगन्नाथ चोपडेकर : 8550920696
बाबल चोपडेकर : 8698020286
तिमाजी गवसकर : 9764326110