
वैभववाडी : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या वीरांना अभिवादन करण्याच्या हेतूने वैभववाडी तालुका पत्रकार समितीतर्फे 26 नोव्हेंबरला ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.सकाळी ९ते दुपारी 2 या वेळेत हे शिबीर संपन्न होणार आहे.इच्छुक रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 साली दहशतवाद्यांचा हल्ला झाला. या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरीक, पोलीस, सैनिक शहीद झाले होते. या सा-यांना श्रद्धांजली म्हणून वैभववाडीत महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, शासकीय कार्यालये व संघटना यांच्या सहकार्याने हे शिबीर होत आहे.
शहिदांनी देशाच्या सुरक्षिततेसाठी प्राणांची आहुती दिली. त्यांची कृतज्ञतापूर्वक आठवण ठेवत गरजू रुग्णांना रक्ताच्या स्वरूपात जीवनदान देणे हीच खरी देशसेवा आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी केले आहे.










