
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सुभाष पाकळे फाऊंडेशन चे अध्यक्ष सचिन पाकळे यांनी गत वर्षा प्रमाणे यावर्षी 20 सप्टेंबर 2025 रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले असून हे शिबीर सावर्डे येथील मुंबई गोवा महामार्गावरील पाकळे यांच्या नायरा पेट्रोल पंप येथे 10 ते 1 वेळेत पार पडणार असून या शीबिरात सुमारे 150 रक्तेदाते रक्त दान करणार असल्याचे पाकळे यांनी सांगितले
जिल्हातील एकमेव शासकीय रक्तपेढीत सध्या खूप मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने सर्व सामान्य रुग्णांना रक्ताची आभाळ निर्माण झाली आहे. यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय यांच्या वतीने, "दान रक्ताचे वाचवूया प्राण रुग्णाचे" असे आहवानं करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कॅन्सर, सततचे अपघात आणि विविध आजाराचे प्रमाण वाढल्याने शासकीय रक्तपेढीत तुडवडा निर्माण झाल्याने जिल्ह्यातील सामाजिक संस्था मंडळे, सामाजिक कार्यकर्ते ,वैद्यकीय संस्था, शासकीय कार्यालय यांना रक्त दानाचे अहवान करण्यात आले आहे.










