पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

Edited by: विनायक गांवस
Published on: September 20, 2024 13:49 PM
views 197  views

सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. त्याचे उद्घाटन सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते झाले. यावेळी  सरचिटणीस महेश सारंग यांनी रक्तदान शिबीरात सहभाग घेत रक्तदान केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजू परब जिल्हा निमंत्रित सदस्य मनोज नाईक, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, उपजिल्हा रुग्णालय प्रमुख डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे, सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे, आंबोली मंडल अध्यक्ष  रवी मडगावकर, माजी पंचायत समिती सभापती  पंकज पेडणेकर, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद गावडे, जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव, सावंतवाडी मंडल सरचिटणीस परिक्षित मांजरेकर, विनोद सावंत, प्रवक्ते ऍड. संजू शिरोडकर माजी नगरसेवक  उदय नाईक, गुरू मठकर, संदेश टेमकर, हनुमंत पेडणेकर, हेमंत बांदेकर तसेच इतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.