कुडाळात 14 ऑगस्टला रक्तदान शिबीर

Edited by: भरत केसरकर
Published on: August 13, 2023 15:29 PM
views 279  views

कुडाळ: भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर कुडाळ येथे, सोमवार दिनांक १४ ऑगस्ट २०२३ रोजी मिल्लत क्लब, कुडाळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान  यांचे संयुक्त विद्यमाने ‘रक्तदान’ शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान’ शिबीर सिद्धिविनायक हॉल येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत संपन्न होणार असुन, जास्तीत जास्त रक्तदात्यानी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.