
वैभववाडी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळे व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रशाळा खांबाळे नं.१ येथे सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वा. या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.रक्तदात्यांंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या शिबिराचे उद्घाटन वैभववाडी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या हस्ते होणार आहे. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून भैरी भवानी प्रतिष्ठान आचिर्णेचे अध्यक्ष अतुल रावराणे, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, खांबाळे सरपंच गौरी पवार, उपसरपंच गणेश पवार, सोसायटी चेअरमन प्रवीण गायकवाड, राजेंद्र पाटील, सिने नाट्य दिग्दर्शक दीपक कदम, युवासेना जिल्हा समन्वयक गीतेश कडू, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद लोके हे उपस्थित राहणार आहेत.
या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांसाठी लकी ड्रॉ असणारं आहे.याद्वारे १ते ५क्रमांकाना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच सर्व सहभागी रकदात्यांना शिवप्रतिमा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात येणार आहे.तरी या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन शिवप्रेमी मित्रमंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ गुरव व सहकाऱ्यांनी केले आहे.