
सिंधुदुर्गनगरी : श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट कसाल आणी माघी गणेश जयंती उत्सवा निमित्त मंगळवारी रक्तदान शिबीर संपन्न झाले.याला उस्पूर्त प्रतिसाद मिळाला असून,एकूण ४८ जणांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबीरात एकुण ५९ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले ११ रक्तदात्यांचे वैयक्तिक वैद्यकीय कारणांस्तव रक्तदान होऊ शकले नाही रक्तदान शिबीराची सुरुवात दादा साईल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट अध्यक्ष नविन बांदेकर, कसाल सरपंच राजन परब तंटामुक्ती अध्यक्ष अवधूत मालणकर यशवंत परब सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढीतील वैद्यकीय अधिकारी डाॅ. संकेत रोटे सिंधुदुर्ग रक्तपेढीतील वैद्यकीय अदिकारी डाॅ.संकेत रोटे,प्रांजली परब,टेक्निशियन रूतुजा हरमलकर,असिस्टंट कांचन परब परिचर प्रथमेश घाडी, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट चे उमेश पावसकर,अरूण मालणकर,व दिपक आळवे सर,सुशिल परब,रूपेश बांदेकर,विक्रांत दळवी,गोविंद भिसे पत्रकार-लवु महाडेश्वर विनोद परब सुनिल आचरेकर श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट कसाल श्री सिध्दिविनायक मित्र मंडळ चे पदाधिकारी रक्तमित्र कसाल ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते