
दोडामार्ग : सार्वजनिक बांधकाम व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त आज दोडामार्ग भाजप पक्ष व चेतन चव्हाण मित्रमंडळ यंच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिराला 52 दात्यानी आपले रक्तदान दान करून अनोख्या पद्धतीने मंत्री चव्हाण यांचा वाढदिवस साजरा केला.
रक्तदान हे श्रेष्ठदान असे म्हणत गेली 15 वर्षे दोडामार्ग तालुक्यात चेतन चव्हाण मित्रमंडळा मार्फत रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधुन आज शुक्रवारी दोडामार्ग पिंपळेश्वर हॉल येथे दोडामार्ग भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केक कापून मंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस साजरा केला. त्या नंतर चेतन चव्हाण मित्रमंडळ यांनी महा रक्तदान शिबीर आयोजन केले. या शिबिराला 52 रक्त दात्यांनी रक्त दान केले. यावेळी नगरध्यक्ष चेतन चव्हाण बोलताना म्हणाले की सर्व प्रथम मी रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.व त्यांच्या या वाढदिवसा निमित्त आमचे मित्रमंडळ यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.रक्तदान हे श्रेष्ठ दान या शिबिराला प्रचंड दात्यांनी आपले रक्तदान करून आमचे मंत्री चव्हाण साहेब यांना आम्ही अशाप्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, प्रभारी मंदार कल्याणकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, राजन म्हापसेकर, रमेश दळवी, चंदू मळीक, नगरसेविका संध्या प्रसादी, अभिमन्यू कुबल, संतोष म्हावळणकर, समीर रेडकर, सुमित म्हाडगूत, स्वप्नील गवस, पिकी कवठनकर, विशाल मणेरीकर, देवा शेटकर, पाराषर सावंत, दीपक गवस, शुभम मुळगावकर, नितीन मणेरीकर, महेश नाईक आदी उपस्थित होते.