उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत रक्तदान शिबीर !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 25, 2023 18:04 PM
views 155  views

वैभववाडी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका शिवसेनेच्यावतीने उद्या  दिनांक २६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे रतकदान शिबीरा आयोजन केले आहे. रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.

    उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस यावर्षी सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्न बुधवारी २६जुलै रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.तसेच २७जुलै रोजी वैभववाडी दत्त मंदिर येथे ठाकरे यांना दीर्घायुष्यासाठी अभिषेक करण्यात येणार आहे.तसेच दुपारी ४ वाजता ज्येष्ठ नागरिकांना सतीश सावंत यांच्याकडून कल्पवृक्ष वाटप करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम शहरातील आंबेडकर भवन येथे होणार आहे. तसेच तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय वैभववाडी व  प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे  येथील रुग्णांना  फळ वाटप करण्यात येणार आहे.

या सर्व कार्यक्रमासाठी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा नेते अतुल रावराणे, युवानेते  संदेशजी पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील शिवसेना ,महिला आघाडी, युवा सेना त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी  व कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख मंगेश लोके व  युवासेना जिल्हाचिटणीस स्वप्निल धुरी  यांनी केल आहे.