सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात रक्तदान शिबिर

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: September 09, 2025 17:24 PM
views 49  views

कुडाळ : कुडाळमध्ये श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या श्री सिंधुदुर्ग राजाच्या गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार नारायणराव राणे यांच्या संकल्पनेतून राणे परिवार आणि सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री सिंधुदुर्ग राजा २१ दिवसांसाठी विराजमान झाले आहेत. या उत्सवादरम्यान धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांसोबतच आरोग्यविषयक उपक्रमांवरही भर देण्यात येत आहे.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ-मालवण विधानसभेच्या वतीने श्री सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात उद्या, १० सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून हे शिबिर सुरू होईल.

हे शिबिर श्री सिंधुदुर्ग राजा दरबार व्यासपीठ, कुडाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. 'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान' या संकल्पनेवर आधारित या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.