
वैभववाडी : आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, वैभववाडी पोलीस ठाणे व जीवनधारा रक्तपेढी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ३८जणांनी रक्तदान केले.
तालुक्यातील सडुरे गावचे सुपुत्र शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांना सन २०१८मध्ये दहशतवादी हल्यात वीरमरण आले होते. त्यांच्या या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सहायक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल,स्थानिक समितीचे अध्यक्ष सज्जनकाका रावराणे, सचिव प्रमोद रावराणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, प्रकाश कुमार रावराणे, विजय रावराणे, डॉ.नयनीश मोरे, राजेश पडवळ मान्यवर उपस्थित होते.