देवगड : मुणगे - कारीवणेवाडीत ब्लॅक पँथर दिसला. देवगड मुणगे येथील ग्रामस्थ निषाद परुळेकर, प्रतिक परुळेकर व सचिन परुळेकर हे येथील रस्त्याने जात असताना त्यांच्या निदर्शनास हे २ वर्षाचे पिल्लू आले. त्यावेळी प्रतिक परुळेकर यांनी आपल्या मोबाईल मध्ये त्याचे छायाचित्र टिपून खात्री केली असता तो दुर्मिळ ब्लॅक पँथर असल्याचे समजले.
मागील चार दिवसापूर्वी हे पिल्लू मुणगे आपईवाडी ग्रामस्थ यांच्या निदर्शनास येत होता असे निषाद परुळेकर यांनी सांगितले. तो साधारण दोन वर्षाचा बछडा असल्याचे प्राणीमित्र यांच्याकडून समजते. कारीवणेवाडी या रस्त्यालगत असलेल्या काजूच्या बागेमध्ये मंगळवार १४ जानेवारी रोजी साडे सहा वाजण्याच्या सुमारास ब्लॅक पँथर तेथे वावरत असल्याचे तेथील ग्रामस्थांना दिसून आले आहे.