भाजपची सावंतवाडीत तिरंगा यात्रा

Edited by: विनायक गांवस
Published on: August 12, 2025 13:49 PM
views 330  views

सावंतवाडी : हर घर तिरंगा या अभियान अंतर्गत जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेमध्ये आज सावंतवाडीकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. राष्ट्र प्रेमाचे प्रतीक म्हणून या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. 

या यात्रेमध्ये सावंतवाडी तालुक्यातील विद्यार्थी , एनसीसी कॅडेट्स, महिला, डॉक्टर, पत्रकार, व्यापारी, तसेच तालुक्यातील असंख्य नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थित दिसून आली. सावंतवाडीकरांच्या मनात असलेल्या राष्ट्रप्रेमाची प्रचिती यावेळी दिसली. शहरातून भव्य अशी तिरंगा यात्रा निघाली होती. या तिरंगा यात्रेला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, हर घर तिरंगा जिल्हा संयोजक संदीप गावडे, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, मनोज नाईक, दिलीप भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.