भाजपाची आज ओरोस येथे ‘टिफिन पार्टी' | केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची उपस्थिती

Edited by: भरत केसरकर
Published on: July 09, 2023 11:46 AM
views 226  views

सिंधुदुर्ग : मोदी @ ९ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनमध्ये 'टिफीन पार्टी' चे आज रविवारी ९ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. या टिफीन पार्टीत केंद्रिय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे उपस्थित असणार आहेत. या टिफीन पार्टीत केंद्रीयमंत्री नारायण राणे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.थोडयाच वेळात ह्या टिफीन पार्टीला सुरुवात होणार आहे.