
वेंगुर्ला : तालुक्यातील होडावडा ग्रामपंचायत उपसरपंच निवडीत जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे राजबा सावंत हे बिनविरोध विराजमान झाले आहेत. यावेळी भाजप तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर यांनी पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, नवनिर्वाचित सरपंच रसिका केळुसकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल यांच्यासाहित नवनिर्वाचित सदस्य व होडावडा ग्रामस्थ उपस्थित होते.