वैभववाडी ता.ख.वि.संघाच्या चेअरमन पदी भाजपचे प्रमोद रावराणे ; व्हा.चेअरमन पदी अंबाजी हुंबे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 10, 2022 15:28 PM
views 298  views

वैभववाडी : तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमन पदी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच व्हाईस चेअरमन पदी माजी सभापती अंबाजी हुंबे यांची निवड झाली. संचालक मंडळाच्या बैठकीत दोन्ही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली .निवडीनंतर श्री.रावराणे यांनी सर्वांचे आभार मानले.   

तालुक्यातील महत्त्वाची सहकारी संस्था असलेल्या तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध झाली. संघाच्या संचालक मंडळाचीही निवड  बिनविरोध झाली होती. त्या पाठोपाठ चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. संघाची आज सभा झाली, या सभेमध्ये चेअरमन पदासाठी प्रमोद रावराणे यांची तर व्हा. चेअरमन पदासाठी अंबाजी हुंबे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या पदांकरिता इतर कोणाचेही अर्ज दाखल न झाल्यामुळे या दोन्ही जागा बिनविरोध जाहीर करण्यात आल्या. निवडीनंतर श्री रावराणे व हुंबे यांचे सर्वपक्षीय नेते मंडळींकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी श्री. रावराणे यांनी बोलताना असे सांगितले की तालुक्यातील शेतकऱ्यांचा हा संघ आहे. या संघाला आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी पुढील पाच वर्षे आम्ही काम करणार आहोत. तसेच या संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळींची मोलाची साथ लाभली त्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार मानले. त्याचबरोबर चेअरमन पदासाठी भाजपा पक्ष तसेच आमदार नितेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जबाबदारी दिली ती जबाबदारी समर्थपणे सांभाळून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पुढील पाच वर्षात प्रलंबित असलेले सर्व कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार आहोत. सर्वांना एकत्रित घेऊन संघाचे कामकाज पारदर्शकपणे केले जाईल असा विश्वास देखील रावराणे यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, माजी जि प सदस्य सुधीर नकाशे, माजी सभापती अक्षता डफळे शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके ,उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, रमेश तावडे ,दिगंबर मांजरेकर, हुसेन लांजेकर किशोर दळवी संतोष हरियाण, सीमाताई नानिवडेकर, पुंडलिक पाटील,महेश रावराणे, रवींद्र पवार ,संजय रावराणे, सुहास सावंत, उत्तम सुतार यासह संघाचे संचालक व तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.