
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमन पदाची निवडणूक आज पार पडली. यात चेअरमनपदी भाजपचे प्रमोद गावडे तर व्हाईस चेअरमन पदासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे रघुनाथ उर्फ राजन रेडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ह्या दोन्ही नावांची घोषणा केली होती.
सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघावर भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युतीनं महाविकास आघाडीचा सुपडा साफ करून निर्विवाद सत्ता स्थापन केली होती. पंधरापैकी पंधरा संचालक हे युतीचेच निवडून आल्यानं चेअरमन व्हाईस चेअरमन निवड बिनविरोध पार पडली. चेअरमन पदी भाजपचे प्रमोद गावडे तर व्हाईस चेअरमन पदासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे रघुनाथ उर्फ राजन रेडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असून केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दाखविलेला विश्वास सार्थकी लावणार असल्याच मत नवनिर्वाचित चेअरमन प्रमोद गावडे, व्हा. चेअरमन रघुनाथ रेडकर यांनी व्यक्त केले. यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे अशोक दळवी, अनारोजीन लोबो, भाजपचे गुरूनाथ पेडणेकर, सहाय्यक निबंधक अनिल क्षीरसागर, बबन राणे, प्रवीण देसाई, आत्माराम गावडे, दत्ताराम हरमलकर, प्रभाकर राऊळ, प्रमोद सावंत, शशिकांत गावडे, ज्ञानेश परब, विनायक राऊळ, रेश्मा निर्गुण, नारायण हिराप, भगवान जाधव, अभिमन्यू लोंढे, हनुमंत पेडणेकर, गजानन नाटेकर आदींसह खरेदी-विक्री संघाचे सदस्य, युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.