वाभवे - वैभववाडी न. पं. च्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे प्रदीप रावराणे बिनविरोध

Edited by:
Published on: March 12, 2025 19:50 PM
views 126  views

वैभववाडी : वाभवे - वैभववाडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यपदी प्रदीप रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.निवडीनंतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केले. पक्षाच्या धोरनानुसार संजय सावंत यांनी उपनगराध्यक्ष  पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली होती.निवडणुक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. उपनगराध्यक्ष पदासाठी प्रदीप रावराणे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता.श्री. कातकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.श्री.रावराणे यांची निवड झाल्यानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांच अभिनंदन केले.

यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, माजी उपनगराध्यक्ष संजय सावंत, माजी नगराध्यक्षा नेहा माईणकर, बांधकाम सभापती रणजित तावडे, आरोग्य सभापती रोहन रावराणे, नगरसेवक विवेक रावराणे,  राजन तांबे,  सुभाष रावराणे, नगरसेविका संगीता चव्हाण,  दर्शना पवार,  यामिनी वळवी, यांच्यासह सर्व नगरसेवक तसेच माजी उपसभापती बंडया मांजरेकर, शांतेश रावराणे, मारुती मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते.