
वेंगुर्ला : तालुक्यातील परबवाडा ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच पप्पू परब यांनी आपला करिश्मा दाखवत एक हाती भाजपची सत्ता आणली होती. यानंतर आज पप्पू परब यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यानंतर परबवाडा सरपंच शमिका बांदेकर तर उपसरपंच पप्पू परब यांचे भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई , जिल्हा उपाध्यक्ष ॲड.सुषमा खानोलकर, महीला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ.सारीका काळसेकर, ता. सरचिटनीस वृंदा गवंडळकर यांनी अभिनंदन केले.
यावेळी ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, माजी उपसरपंच तथा नवनिर्वाचित ग्रां. सदस्य हेमंत गावडे, माजी सरपंच इनसिन फर्नांडीस, नवनिर्वाचित ग्रा. सदस्य संतोष सावंत, कार्तिकी पवार, अरुणा गवंडे, सूहिता हळदणकर, स्वरा देसाई, माजी उपसरपंच संजय मळगावकर, माजी ग्रा. सदस्य अर्चना परब, समीर चिंदरकर, सायमन आल्मेडा, प्रमोद नाईक, अनिल गवंडे, अजित गवंडे, सुनील परब, कांता देसाई, सचिन सावंत, किशोर गवंडे, सावळाराम साळगावकर, डॉ बाळू गवंडे, किरण पवार, अजित पवार, मंगेश परब, आदित्य परब, अक्षय परब, सर्वेश परब, शैलेश बांदेकर, आनंद शिरोडकर, अंजली टेमकर, अॅना डिसोजा, पूर्वा पानकर, अजय गवंडे, सुभाष हळदणकर, शांती देसाई, सुचित्रा बांदेकर, सुवर्णा सावंत, सरिता परब, रवींद्र परब, रवी परब, मयुरेश परब, गायचोर मॅडम आदी उपस्थित होते .