
सावंतवाडी : भाजप नेते महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली कारीवडे गावात भाजपच्या पॅंनलचा बहुमताने विजय होणार असल्याचा दावा शक्ति केंद्र प्रमुख आनंद तळवणेकर यांनी केला. तर सरपंच पदाच्या उमेदवार आरती माळकर यांच्यासह सर्व पॅंनल भरघोस मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने भाजप पुरस्कृत पॅनेलचे कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना व भाजप यांच्या युतीत फूट पडली असून तळवणेकर यांनी गावात पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा दावा केला आहे.