भाजपच्या दोडामार्ग ओबीसी सेल तालुकाध्यक्षपदी सिद्देश पांगम

भाजपा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र
Edited by: संदीप देसाई
Published on: October 09, 2022 19:38 PM
views 289  views

दोडामार्ग : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले भेडशी येथील भाजपचे युवा कार्यकर्ते सिद्देश मोहन पांगम यांची भारतीय जनता पार्टीच्या तालुका कार्यकारीणीत निवड करत त्यांची तालुका ओबीसी सेलच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पांगम यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीबाबत भेडशीतील युवाईत नवचैतन्य पसरले आहे.

  भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी दिलेल्या निवड पत्रात अभिनंदन करताना दळवी यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टी शत प्रतिशत वाढविण्यासाठी आपले कार्य व मेहनत खुप मोलाचे आहे. त्यामुळे  आपल्यावर आता पुन्हा एकदा नव्या जबाबदारीचा टाकलेला विश्वास आपण नक्की सार्थकी लावाल, यात तिळमात्र शंका नाही. आपण भारतीय जनता पार्टी दोडामार्ग शत-प्रतिशत करुन देशकार्यास आपण हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

 भारतीय जनता पार्टीच्या दोडामार्ग येथील एकता मेळाव्यात आमदार नितेश राणे यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा संयोजक महेश सारंग यांच्या हे नियुक्तीपत्र देण्यात आले. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्राच्या तालूकाप्रमुख पदाची जबाबदारी सुध्दा सिद्देश पांगम यांच्याकडेच आहे.