ओरोसच्या सरपंचपदी भाजपच्या आशा मुरमुरे तर उपसरपंचपदी गौरव उर्फ महादेव घाडीगावकर !

भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले संतोष वालावलकर व सुप्रिया वालावलकर
Edited by: भरत केसरकर
Published on: December 31, 2022 17:24 PM
views 299  views

सिंधुदुर्गनगरी : ओरोस ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ. आशा मुरमुरे यांची निवड झाल्यानंतर आता या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गौरव घाडी या उमद्या नेतृत्वाची निवड झाली आहे. गौरव घाडी हे वयाने लहान असले तरी राजकीय प्रवासात दाखवलेली झलक फार मोठी आहे. नगरपंचायतीकडे वाटचाल करणाऱ्या या ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडून येत उपसरपंचपदी मारलेली मजल गाव विकासाच्या दृष्टीने कौतुकास्पद मानली जात आहे.

नगरपंचायतीचे स्वप्न पहाणार्‍या ओरोस ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या बाजूने निर्विवाद कौल दिला आहे. भाजप सरपंच आशा गजानन मुरमुरे यांच्यासह १३ पैकी १० भाजप सदस्यांना मतदारांनी निवडून दिले होते. भाजप सोबत युती झालेले शिंदे शिवसेना गटाचे प्रकाश देसाई यांनाही विजयाची संधी मिळाली होती. भाजपचे संतोष वालावलकर व सुप्रिया  वालावलकर हे उभयता या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. 

 ओरोस ग्रामपंचायतीवर तरुण सदस्य म्हणून 26 वर्षीय गौरव बाळा घाडिगावकर यांचा विजय लक्षवेधी मानला जात आहे. तर माजी सरपंच प्रिती देसाई यांचे पती प्रकाश देसाई यांनी शिंदे शिवसेना गटात जात भाजपशी प्रामाणिक युती केल्याने त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. शिवसेनेचे अमित भोगले व योगेश तावडे या तरुण सदस्याना या निवडणूकीत यश मिळाले.

प्रभाग एक मधून अमित भोगले (शिवसेना), पुजा मालवणकर (भाजप), प्रभाग दोन मधून (सिंधुनगरी) तेजश्री राऊळ (भाजप), सौ राजश्री राऊळ (भाजप), सौ भक्ती पळसंबकर(भाजप), प्रभाग तीन मधून सौ प्रिया आजगावकर(भाजप), गौरव घाडीगावकर (भाजप), सौ शमिका सावंत (भाजप), प्रभाग चार मधून योगेश तावडे (शिवसेना), पांडुरंग मालवणकर (भाजप), कु. रसिका वंजारे (भाजप), व प्रभाग ५ मधून सौ गौरी बोंद्रे (भाजप),व प्रकाश देसाई विजयी झाले होते. आता नवीन वर्षात सरपंच उपसरपंच यासह नवीन ग्रामपंचायत सदस्य या ग्रामपंचायतीचा कारभार हाकणार आहेत.