रहाटेश्वरातील उबाठा कार्यकर्ते भाजपात

Edited by:
Published on: November 17, 2024 12:51 PM
views 173  views

देवगड : आ. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड तालुक्यातील रहाटेश्वर गावातील उबाठा कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास गुरव यांच्या समवेत उबाठा कार्यकर्ते महेश कदम, सुहास कदम, प्रकाश ताम्हणकर, विजय कदम, सुधीर कदम, गजानन साळवी आत्माराम घाडी, नितीन कदम, विजय घाडी, गणेश घाडी, स्नेहलता घाडी, स्वाती घाडी, मनाली घाडी यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. 

आ.नीतेश राणेंच्या कार्याप्रणालीने प्रेरित होऊन व त्याच्या विकास कामाचा झंझावात पाहून आपण भाजप पक्ष प्रवेश करता असल्याबद्दल प्रवेश कर्त्याणी या वेळी सांगितले. या वेळी भाजप शक्ती केंद्रप्रमुख अमित कदम सरपंच कल्पना कदम, बूथ अध्यक्ष लवू इळकर, युवा प्रमुख विनायक कदम आदी उपस्थित होते.