भाजपला धक्क्यावर धक्का !

जिल्हाप्रमुखांकडून करेक्ट कार्यक्रम
Edited by: विनायक गावस
Published on: October 27, 2025 12:20 PM
views 1205  views

सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी भाजपला आणखीन एक धक्का दिला आहे. तळवणे उपसरपंच रामचंद्र गावडे यांनी आज कमळाची साथ सोडत हाती भगवा ध्वज घेतला आहे. दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश घेण्यात आला. 

शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते विद्यमान उपसरपंच रामचंद्र (रंजन) गावडे, माजी उपसरपंच निलेश गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रविण बर्वे,संजय पालव,संतोष गावडे,आबा गावडे,प्रसाद गाडगीळ,रामदास गावडे,आबा पालव,सुरेश कांबळी,सुरेंद्र मेस्त्री,बाबी गावडे,विजय गावडे ,किशोर गावडे,दिगंबर गावडे ,मयूर गावडे,उमेश नाईक,प्रतीक मातोंडकर,प्रसाद नाईक,राजेश गावडे,रमण मेस्त्री, ज्ञानेश्वर तळवणेकर, प्रतिक गावडे,लक्ष्मण पडवळ,जगन्नाथ फटजी, दीपक परांजपे,उमेश रेडकर,गणेश चोडणकर,महेश रेडकर,वासुदेव बर्डे,अनिल वारंग

शशांक चोडणकर आदींसह शेकडोंनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड निता सावंत-कविटकर, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, सुधा कवठणकर, सुरेंद्र बांदेकर, उपतालुकाप्रमुख राकेश पवार, अनुसुचित जाती सेल युवा प्रमुख प्रशांत जाधव, विनोद सावंत, गजानन नाटेकर, अर्चित पोकळे, महादेव राऊळ आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.