
दोडामार्ग : भाजप बरोबर कोणी येऊ अगर नको येणाऱ्या निवडणुकांची तयारी करा. गावागावात बूथ निहाय बैठका घ्या संघटना मजबूत करा येणाऱ्या निवडणुकीत विजय आपलाच आहे. त्यामुळे पुढील दोन महिने सर्व बूथ पिंजून काढा आपला कार्यकर्ता आपला परिवार आहे. त्यामुळे आताच कामाला लागा असे प्रतिपादन भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.
भाजप कार्यकर्ता बैठक येथील दोडामार्ग भाजप कार्यालय येथे पार पडली. त्यावेळी ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलत होते. ते बोलताना म्हणाले की दोडामार्ग तालुक्यात 57 गाव आहेत असा कुठचा गाव नाही की त्या गावात भाजप चे कार्यकर्ते पदाधिकारी नाही आहेत. दोडामार्ग भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या जोमाने काम करत आहे. 2014 पासून विधानसभेच्या निवडणुकीत भाजप पक्षाने प्रत्येक ठिकाणी आघाडी घेतली आहे. त्यामुळे विशेष करून मी दोडामार्ग तालुक्याचे खूप खूप अभिनंदन करतो. नवरात्री नंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लागणार आहे. त्या निवडणुकीत आपल्याला यश मिळविण्यासाठी आपल्या तालुक्यातील 57 बूथवर बूथ निहाय बैठका घ्या जशी तालुक्याची बैठक घेतली जाते तशी प्रत्येक बूथनिहाय बैठक घ्या कारण या दोन निवडणुका मध्ये आपण आपला उमेदवार कसा निवडतो बूथवरून आपला उमेदवार ज्यावेळी निवडून येतो यावर सर्व काही आपलं आहे. असं बूथनिहाय काम करून उमेदवार निवडून देणार अशा प्रकारे नेटवर्क अशा प्रकारे प्रयोग करणारा जिल्ह्यात एकमेव तालुका म्हणजे दोडामार्ग तालुका आहे. कारण भारतीय जनता पार्टी निवडणुकीत जे यश मिळवलं ते पैशाच्या जीवावर नाही तर आपल्या संघटनेच्या ताकदीच्या जीवावर यश मिळवलं.
यशाची चटक लावणारा तालुका : अतुल काळसेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला यशाची चटक लागली ती म्हणजे दोडामार्ग तालुक्यामुळेच दोडामार्ग तालुक्या पक्ष संघटना मजबूत आहे. गेली 20 वर्षे मी अनुभव घेत आहे प्रत्येक निवडणुकीत आपल्याला यश मिळालं आहे. त्यामुळे यशाची चटक लागते ती या दोडामार्ग तालुक्यापासुन. त्यामुलळे सुधीर काळजी करू नका येणाऱ्या निवडणुकीत कोणीही आमच्या सोबत येऊ अगर नको आम्ही या तालुक्यात घवघवीत यश मिळणार. असे अतुल काळसेकर बोलताना म्हणाके.
भाजपमध्ये गटतट नाही
दोडामार्ग भाजपमध्ये गट असल्याचा प्रश्न विचारला असता जिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले की मी भाजप जिल्हाध्यक्ष आहे जवळ जवळ 2 वर्षे होत आली मला दोडामार्ग मधील भाजपच्या कुठच्याही कार्यकर्त्यांत गट तट दिसलेले नाही. विरोधक फक्त अफ़वा करतात वातावरण निर्माण करतात. त्यामुळे विधानसभा, लोकसभा, पदवीधर निवडणुका झाल्यात यात कुठेही आमच्या पक्षात गट नाही सर्वांनी एकत्र येऊन काम केल आहे आणि त्याच रिझल्ट तुमच्या समोरच आहे.
एकनाथ नाडकर्णी हे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. मध्यंतरी पक्षापासून दूर होते. मात्र जो त्यांनी मेळावा घेतला तर भाजपच्या काही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की त्यांना भाजप पक्षात परत घ्यावे यासाठी त्यांनी तो मेळावा घेतला होता. आता त्यांना पक्षात घेणं हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे ते काय ते ठरवतील.
100% रिझल्ट देणारा तालुका : प्रभाकर सावंत
कार्यकर्ता बैठकी दरम्यान बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले की आपल्या सिंधुदुर्गचे सुपुत्र रवींद्र चव्हाण आज प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत. त्यांनी भाजप संघटना ही उंचीवर नेऊन ठेवलेली आहे. तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेच्या निवडणुकीत खासदार नारायण राणे आहेत, पालकमंत्री त्यांच्या कामाचा धडाका आपण पाहतच आहात त्यामुळे अशी मंडळी असताना आपला पक्ष नक्कीच मजबूत आहे. आणि मगाशी सुधीर दळवी म्हणाले की स्वबळावर लढायच युती करायची की नाही हे वरिष्ठ निर्णय घेतील. पण तुमच्या भावना व मागण्या नक्कीच आम्ही वरिष्ठ पातळीवर पोहचवू व युती, आघाडी हे निवडणुकी पूरती असत. पण पक्ष संघटना हे आपल्याला स्वबळावरच लढाव लागत आता पासूनच पक्ष संघटना वाढीसाठी कामाला लागा येत्या नवरात्री नंतर निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे झोकून काम करा असे सावंत यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले.
प्रत्येक दिवसाला पोलिसांचा फोन येतो
यावेळी भाजपचे तालुका मंडळ अध्यक्ष दीपक गवस यांचे अतुल काळसेकर यांनी अभिनंदन केले आणि ते म्हणाले की भाजपने जे अध्यक्ष नेमले आहेत सर्व तरुण युवा अध्यक्ष नेमले आहेत आणि दोडामार्गचे जे आमचे दीपक गवस आहेत त्यांची काम करण्याची पद्धत आम्ही पाहिली आहे. साटेली भेडशी येथील एक अनधिकृत इमारत व त्यामध्ये सुरु असलेल उर्दू शिक्षण ही इमारत पाडण्यासाठी इथल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यामुळे प्रत्येक दिवस उजाडला की त्यांना पोलिसांचा फोन येतो कधी आला नाही अस कधीच झालं नाही. असच काम करत रहा. आणि काम करणारे कार्यकर्ते भाजप पक्षात हवे आहेत त्यामुळे जोमाने काम करा.
100 हुन अधिक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.
दोडामार्ग भाजप कार्यकर्ता बैठकीवेळी दोडामार्ग साटेली भेडशी, उसप, पणतुर्ली दोडामार्ग शहरातील कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर व जिल्हा प्रमुख प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्यात आला.