
देवगड : भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या नेतृत्वाखालील देवगड शिरगाव येथील बाजार पेठेत तालुक्यातील भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, देवगड मंडल अध्यक्ष राजेंद्र शेट्ये, सुभाष नार्वेकर, ग्रामपंचायत सदस्य शितल तावडे, सुहास राणे, संजय शिंदे, पोरे, विकास घाडी, दिपक शेट्ये, निलेश शिंदे, विशाल कुवळेकर आदी भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी शिरगाव जि.प.मतदार संघातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचा निर्धार येथील कार्यकर्त्यांनी केला असून या सदस्य नोंदणी अभियानास सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असाल्याचे सांगण्यात आले आहे.