सावंतवाडी : भाजपा सदस्य नोंदणी अभियान आज सावंतवाडी शहरात प्रभाग क्रमांक ५ येथे राबवण्यात आले. यावेळी माजी आरोग्य सभापती, नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी प्रभाग क्रमांक 5 चे अध्यक्ष ॲड. संजू शिरोडकर, बूथ अध्यक्ष अमित गवंढळकर, सुमित वाडकर, संदेश टेमकर, प्रसाद देऊलकर, गणेश कुडव, साई परब, विपुल वराडकर, शशांक मुळीक आदी उपस्थित होते.