बांद्यात भाजपची प्रचारात आघाडी

सरपंच पदाच्या उमेदवार प्रियांका नाईक रिंगणात | विजयासाठी माजी सरपंचांची फौज मैदानात
Edited by: विनायक गांवस
Published on: December 14, 2022 16:22 PM
views 250  views

बांदा : बहुचर्चित अन् गेली २५ वर्ष भाजपची सत्ता असणाऱ्या बांदा ग्रामपंचायतीत दुरंगी लढत होत आहे. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत बांदा नागरी विकास आघाडीच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवार प्रियांका नाईक यांच्यासह पॅंनलच्या उमेदवारांनी प्राचार आघाडी घेतली असून मतदार संघ पिंजून काढत विकासाला कौल देण्यासाठी आवाहन केल. तर जनतेची साथ भाजपला असून बांद्यात पुन्हा एकदा भाजपच कमळ फुलणार आहे. माझ्यासह १४ ही भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास सरपंच पदाच्या उमेदवार प्रियांका नाईक यांनी व्यक्त केला. तर श्यामसुंदर मांजरेकर यांची बिनविरोध निवड झाली असून उर्वरित सदस्य देखील भाजपचेच निवडून येतील असा दावा त्यांनी केला. 


बांदा नागरी विकास आघाडीच्या माध्यमातून अनुभवी, कार्यक्षम, शैक्षणिक पात्रता असलेले नामवंत, तडफदार १५ उमेदवार व सरपंच अनुभवी, सुस्वभावी कार्यतत्पर श्रीम. प्रियांका परशुराम नाईक आपल्या समोर थेट सरपंच पदाचा उमेदवार म्हणून उभ्या आहोत. हे सर्व उमेदवार आपल्या कार्यकुशलतेने सार्वजनिक, सामाजिक कामे अतिशय वेगाने आणि तत्परतेने पुढे नेल्याशिवाय राहणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रिय मंत्री नारायण राणे व इतर केंद्रिय मंत्रिमंडळ आपल्या विविध योजनांद्वारे ग्रामीण भागातील जनतेची कामे, प्रश्न, समस्या दूर करण्याचे कार्य करत आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर पक्षीय नेते, आपल्या जिल्हाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण या सर्वांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने आमचे हे उमेदवार गावाचा सर्वांगीण विकास करतील यात कोणतीही शंका नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत असलेले सत्तेचे समीकरण योग्य असेल तर, गावाच्या विकासाला निश्चितच दिशा मिळते. मागील कार्य काळातील सरपंच मंदार कल्याणकर, विद्यमान सरपंच अक्रम खान व माजी पं.स. सभापती वसंत (शितल) राऊळ, माझ्या व सर्वांच्या कार्यशैलीने आणि नियोजित केलेली अनेक विकासाची कामे खऱ्या अर्थाने येणाऱ्या पुढील कार्यकाळात मार्गी लागणार आहेत. शहरातील नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ही मंडळी प्रयत्नशील असून बांदावासीय आमच्या पॅनलला बहुमताने विजयी करतील असा विश्वास माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर यांनी व्यक्त केला. 

गेली २५ वर्ष ही ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आहे. यंदाच्या

पंचवार्षिक निवडणूकीत आमचे सरपंच व १५ ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन इतिहास घडवतील असा विश्वास माजी उपसभापती शितल राऊळ यांनी व्यक्त केला. तर चार ते पाच माजी सरपंचांची साथ भाजपच्या पॅनला असून बांद्याच्या सर्वांगिण विकासासाठी हे पॅंनल नक्कीच गती देईल.


दरम्यान, सरपंच पदाच्या उमेदवार प्रियांका नाईक म्हणाल्या, मागच्या कालावधीत आम्ही गावच्या विकासासाठी काम केलं असून मोदी सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविल्या आहेत. पाचही प्रभागात आमच्या टीमन मेहनत घेतली असून सुशिक्षित असे उमेदवार आम्ही दिले आहेत‌. तर आमचे कार्यकर्ते देखील प्रचंड मेहनत घेत असून या सर्वांच्या मेहनीच्या जोरावर आम्ही सर्वजण प्रचंड बहुमतानं निवडून येऊ, लोकांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावू अस मत त्यांनी व्यक्त केल. 


तर प्रभाग २ चे सदस्य पदाचे उमेदवार जावेद खतिब म्हणाले, आमचे सर्व उमेदवार सुशिक्षित असून त्यांच आपआपल्या प्रभागात काम आहे. मी स्वतः गेली पाच वर्षे सदस्य म्हणून काम केल आहे. या प्रभागात केलेल्या विकास कामाच्या जोरावर मी पुन्हा मैदानात उतरलो आहे. 

येथील लोकांवर माझा विश्वास असून गेल्या टर्म प्रमाणे यंदाही सगळ्यात जास्त मतं देऊन ते मला  निवडून येणार आहेत. देश व राज्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण आदी नेत्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गात विकास होत आहे. त्यामुळे जनता बांद्यात भाजपच्या पॅनलालच आपला कौल देईल असा विश्वास जावेद खतिब यांनी व्यक्त केला‌. 


डोअर टू डोअर प्रचारावर भर देत त्यांनी पाचही प्रभाग पिंजून काढले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, माजी उप सभापती शितल राऊळ, भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार प्रियांका नाईक, जावेद खतिब, श्रेया केसरकर, स्मिता पेडणेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.