
कुडाळ : भारतीय जनता पार्टी " कुडाळ शहराच्यावतीने भाजपा नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा १०० वा " मन की बात " हा कार्यक्रम एकत्रित रित्या लाईव्ह स्क्रीनवर पाहण्यासाठी मराठा समाज एसी हॉल कुडाळ येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली व महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ संध्या तेरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष राजन तेली, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे, मन की बात जिल्हा संयोजक बंड्या सावंत, शहर अध्यक्ष राकेश कांदे गटनेते विलास कुडाळकर तसेच शहरातील पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी ,नगरसेवक, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख ,भाजप कार्यकर्ते यांनी उपस्थित होते.










