
दोडामार्ग : भाजप - सीपीएए मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराचा शनिवार नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते पिंपळेश्वर हॉल येथे शानदार शुभारंभ करण्यात आला. यावेळी आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद होता.
या महाआरोग्य शिबिरात जनरल सर्जरी तोंडाच्या पोकळीची तपासणी, बकल म्युकोसा, कडक आणि मऊ ताळू, जीभ आणि कर्करोगा पूर्वीच्या जखमांसाठी तपासाणी, कान - नाक - घशाची तपासणी कर्करोग, तोंडाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, फीजीशीयन, प्राथमिक रक्त तपासाणी आदी आजारांवर सर्व प्रकारची तपासणी करण्यात आली.