
सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करताना सोबत असलेल्या संभाव्य उमेदवार दुराली रांगणेकर यांना भाजपकडून फोडत प्रभाक क्रमांक ५ मधून उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत त्यांची उपस्थिती बघता भाजपने नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी ही खेळी केली आहे.

प्रभाग क्रमांक ५ मधून दुराली रांगणेकर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात उबाठा शिवसेनेच्या कृतिका कोरगावकर, शिवसेनेच्या माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर मैदानात आहेत. रांगणेकर कुटुंबाचे या भागात प्राबल्य आहे. मात्र, उबाठा शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत संभाव्य उमेदवार म्हणून असणाऱ्या सौ. रांगणेकर यांना भाजपकडून उमेदवारी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपची ही खेळी कितपत यशस्वी ठरणार हे ३ डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.










