
रत्नागिरी : रत्नागिरीत भाजपा जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठक झाली. या बैठकीत खासदार नारायण राणे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भाजपा रत्नागिरी दक्षिण मधील प्रमुख पदाधिकारी, बूथ वारियर्स, बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख यांच्याशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, लोकसभा सहप्रभारी बाळ माने, माजी आमदार प्रमोद जठार, रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उपजिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख उल्का विश्वासराव, विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद अधटराव, अभिजीत गुरव, बाबा परुळेकर, शिल्पा मराठे आदी मान्यर व पदाधिकारी उपस्थित होते.