भाजपा वर्धापनदिन - नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त चिपळूणमध्ये होम मिनिस्टर स्पर्धा

Edited by:
Published on: April 07, 2025 12:51 PM
views 80  views

चिपळूण :  भारतीय जनता पार्टी वर्धापन दिन दि.६ एप्रिल आणि  खासदार नारायणराव  राणे साहेब यांचा वाढदिवस दि. १० एप्रिल रोजी  या दोन्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने  दिनांक १० एप्रिल  रोजी  चिपळूण तालुका मर्यादित  महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या पद्धतीने प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या फक्त १०० महिलांना सहभागी होता येणार आहे. त्यामुळे आपली नोंदणी करून सहभागी होवून महाराष्ट्राची शान असलेली पैठणी जिंका! असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेची माहिती खालील प्रमाणे आहे. फक्त विवाहित महिलेलाच सहभागी होता येईल. स्पर्धेची वेळ १० एप्रिल २०२५ सायंकाळी ४.३० पासून इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रासमोरील मैदानात होईल.स्पर्धेत होम मिनिस्टर प्रमाणे छोटे छोटे गमतीशीर खेळ होतील. जे सर्वांना सहज जमतील. यासाठी कोणतीही एंट्री फी घेण्यात येणार नाही.

प्रथम विजेत्या होणाऱ्या महिलेस साड्यांची महाराणी "पैठणी" सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल. त्यानंतरच्या क्रमांकासाठी  असणाऱ्या महिलांनाही आकर्षक साडी बक्षीस देण्यात येणार आहे.


या शिवाय काही सरप्राईज गिफ्ट असणार आहेत .

नाव नोंदणी साठी संपर्क. 

शितल रानडे  (9765844780),  

सौ सारिका भावे (9421137110),

प्रणाली सावर्डेकर 9545590708

रसिका देवळेकर  9923432483

श्रद्धा कदम 7767948182

पूनम काजारी 9890170078

जया केतकर  (9881204716),  निकिता रतावा   (7276683223) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.