
दोडामार्ग : तळकट गावचे सुपुत्र, सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष, फळबागायतदार संघाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यात सदैव अग्रस्थानी राहिलेले, कोणत्याही विषयावर प्रभावी वकृत्वशैलीतून ठाम मत मांडणारे, स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व विजयकुमार भिकाजी मराठे यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी १८ नोव्हेंबर २०२५ ला दु:खद निधन झाले.
त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय तसेच शेतकरी क्षेत्रातील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. दुपारी दोन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.










