उबाठाच्या ग्रा. पं. सदस्य वैशाली जाधव भाजपात !

Edited by:
Published on: November 06, 2024 12:31 PM
views 197  views

वैभववाडी : ऐनारी येथील उबाठा गटाच्या ग्रामपंचायत सदस्या वैशाली विलास जाधव यांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केला आहे.त्यांनी अनेक कार्यकर्त्यांसह मंगळवारी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. 

  भाजपाकडून उबाठा गटाला धक्यावर धक्के बसत आहे.मंगळवारी गावभेट दौऱ्यावर आलेल्या आम नितेश राणेंच्या उपस्थितीत अनेक पक्ष प्रवेश झाले.यावेळी ऐनारीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपच कमळ हाती घेतले.त्यांच्यासोबत विलास राजाराम जाधव, रसिक रवींद्र विचारे व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. सर्व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी भाजपात स्वागत केले.

वैभववाडी येथील भाजपा कार्यालयात हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, शारदा कांबळे, प्राची तावडे, संजय सावंत, प्रदीप जैतापकर, बंड्या मांजरेकर, दाजी पाटणकर व पदाधिकारी उपस्थित होते.