
राजापूर : तालुक्यातील गोवळचे सरपंच अभिजीत कांबळे यांची भारतीय जनता पार्टी द. रत्नागिरीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ति करण्यात आली आहे.
पक्षांनी आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी अभिजीत कांबळे यांच्या सारख्या उच्च विद्या विभूषित उत्तम संघटन कौशल असणाऱ्या जनता पार्टी च्या बांधणीचा व प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रामाणिक पणे भाजप चे एक निष्ठेने काम करणाऱ्या कांबळे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे .
अभिजीत कांबळे यांची भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने भाजप पक्षातीत सर्व रत्नागिरी राजापूर मधील तसेच मित्र पक्षातील सहकारी पदाधिकारी तसेच गोवळ गावातील ग्रामस्थ आणि त्यांच्या नातेवाईक व मित्र मंडळींनी कांबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.