दोडामार्ग तालुक्यात महायुती करणार संयुक्त प्रचार

शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी महायुतीची समन्वय बैठक
Edited by: संदीप देसाई
Published on: October 30, 2024 13:20 PM
views 162  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी महायुतीची समन्वय बैठक मंगळवारी भाजपा संपर्क कार्यालयात दोडामार्ग येथे संपन्न झाली. 

 या बैठकीत महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद ते गाव निहाय संयुक्त दौरा करणे, गावातील पदाधिकाऱ्यांसह संयुक्त बैठका लावणे, जाहिर सभा घेणे  याबाबत चर्चा करून नियोजन करण्यात आले. त्याचं बरोबर दोडामार्ग शहरातील पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करणे व सर्वाधिक मतदान दीपक केसरकर यांना करणेबाबत तसेच अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळेस खालील प्रमुख भाजप, शिवसेना राष्ट्रवादीवादीच्या पदाधिकारी उपस्थित होते. 

 भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, तालुका प्रभारी मंदार कल्याणकर, शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, भाजपा तालुकाप्रमुख सुधीर दळवी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, तुकाराम बर्डे, राजेंद्र निंबाळकर, सत्यवान गवस, चेतन चव्हाण, संतोष नानचे, दीपक गवस, आनंद तळणकर, पराशर सावंत, चंद्रकांत मळीक, भगवान गवस, राजेश फुलारी, देवेंद्र गवस, गोपाळ गवस, योगेश महाले, दादा देसाई, तिलकांचन गवस, मायकल लोबो, शैलेश दळवी, वैभव सुतार, सूर्यकांत धरणे, दिक्षा महालकर, सूजाता मणेरीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.