LIVE UPDATES

वैभववाडी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्षपदी दिलीप यादव

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 30, 2024 13:09 PM
views 65  views

वैभववाडी : अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पार्टी वैभववाडी मंडल अध्यक्षपदी श्री दिलीप हरी यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अनंत भिकाजी नेवरेकर यांची जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली आहे.  जिल्हाध्यक्ष श्री नामदेव जाधव यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. यावेळी सौ. शारदा कांबळे माजी समाजकल्याण सभापती,  नासिर काझी माजी जि,प अध्यक्ष, सुधीर नकाशे मंडल अध्यक्ष वैभववाडी, भालचंद्र साठे तसेच राजू तांबे उपाध्यक्ष कणकवली मंडल व संतोष कासले, सिध्दार्थ यादव, रमाकांत यादव, प्रकाश कदम उपस्थित होते. 

नामदेव जाधव यांनी होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याप्रमाणे वैभववाडी तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्ती मध्ये जाऊन प्रचार करण्याची सुरुवात केली आहे. राणे साहेबचा पाठीशी सर्व अनुसूचित समाज एकत्र येऊन येत्या 20 नोव्हेंबर ला मतदान करून भरघोस मताधिक्य देणार असे  नामदेव जाधव यांनी सांगितले. यावेळी सौ शारदा कांबळे यांनी ही  मनोगत व्यक्त केले. नूतन मंडळ अध्यक्ष श्री दिलीप यादव यांनी पक्षाने सोपवलेली जबाबदारी पूर्ण ताकदीने पार पाडून नितेशजी राणे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा विश्वास व निर्धार व्यक्त केला.