
वैभववाडी : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचावी या उद्देशाने लाभार्थी सन्मान यात्रेच आयोजन केले होते. येथील इनामदार प्लाझा येथे विविध योजनांचे स्टॉल उभारण्यात आले होते.त्याचा शुभारंभ तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या हस्ते झाला.
या यात्रेत पीएम किसान, लाडकी बहीण, वयोश्री, महिला सक्षमीकरण, एसटी सवलत, कृषी योजना, विज बिल माफ, घरेलू कामगार, बांधकाम कामगार योजना, तीर्थ दर्शन आधार कार्ड, मतदान कार्ड अद्यावत करणे तसेच शासनाच्या योजनांचे नवीन अर्ज दाखल करणे, दाखल केलेल्या अर्जातील त्रुटी बाबत मार्गदर्शन करणं आदींबाबत माहिती देण्यात आली. याकरिता २०स्टॉल उभारण्यात आले होते. या यात्रेत ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनाचे स्टाॅल ही उभारले होते.दिवसभरात तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी याठिकाणी हजेरी लावली.