
मालवण : भाजपाच्या मालवण शहर प्रभारी पदी आचरा येथील संतोष गावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गावकर हे यापूर्वी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष, आचरा जिल्हा परिषद प्रभारी, आचरा, चिंदर ग्रामपंचायत निवडणूक प्रभारी, अशी अनेक पदे भूषविली आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष गावकर यांना मालवण शहराच्या प्रभारी पदी नियुक्ती करून मोठी जबाबदारी भाजपाकडून देण्यात आली आहे. भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ही नियुक्ती केली आहे.