
सावंतवाडी : राज्यात महायुती भक्कम आहे. लोकसभा, विधानपरिषद महायुती म्हणूनच लढलो. स्वबळाची मागणी कार्यकर्त्यांनी केली तरी निर्णय वरिष्ठ घेतील अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा स्वबळावर लढणार का ? असा सवाल केला असता ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच विस्तारीत अधिवेशन ३ ऑगस्टला सावंतवाडीत बॅ. नाथ पै सभागृहात संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तिसरं पर्व सुरू झाले आहे. विरोधकांचे दावे फोल करत देशात पुन्हा भाजपची सत्ता आली. याच पार्श्वभूमीवर काही राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. महाराष्ट्राकडून अधिक अपेक्षा आहे. लोकसभेला कमी यश आम्हाला मिळाल. त्याची भरपाई आम्ही विधानसभेत करण्यासाठी तयारी केली आहे असं मत प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केले.
तर १९ जुलैला पुणे येथे पक्षाच अधिवेशन झाले. त्यावेळी नेतेमंडळीन संबोधित केलं. निवडणूकीची व्युहरचना ठरवण्यात आली. प्रत्येक तालुक्यात असं अधिवेशन भरवाव अशी संकल्पना यावेळी ठरली. कोकण आणि सिंधुदुर्गात आम्हाला भरघोस यश मिळाले. हाच उत्साह व उर्जा मोठ्या मताधिक्यात परिवर्तीत करण्यासाठी हे अधिवेशन होणार आहे. तर माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणेंचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तसेच कोकणचे नेतृत्व करणाऱ्या पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचाही सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती श्री सावंत यांनी दिली. यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, युवराज लखमराजे भोंसले, महेश सारंग, संजू परब, मनोज नाईक, रविंद्र मडगावकर, महेश धुरी, अजय गोंदावळे, सुधीर दळवी, सुहास गवंडळकर आदी उपस्थित होते.