
सावंतवाडी : विलवडेचे ग्रामदैवत देवी माऊली मंदिरचा वाढदिवस रविवार ११ मे रोजी साजरा होत असून या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंदिरात सकाळी १० वाजता देवीच्या पालखीचे सवाद्य मिरवणुकीने आगमन, १०.३० वाजता महाअभिषेक व महापूजा, ११ वाजता सत्यनारायण महापूजा, महाआरती व तीर्थप्रसाद, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध भजनी बुवा गोपाळ दळवी, महेश नाईक, विलास गावडे व सहकारी यांचे भजन, रात्री ९.३० वाजता आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचे 'राजा गोपीचंद' अर्थात 'दत्त दर्शन' हे नाटक होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोपाळ दळवी (देवकर) आणि महादेव दळवी (स्थळकर) तसेच श्री देवी माऊली देवस्थान कमिटी अध्यक्ष बाळकृष्ण दळवी तसेच ग्रामस्थांनी केले आहे.