सिंधुदुर्गातील पक्षी भारतीय डाक विभागाच्या पोस्ट कार्डवर !

डाॅ. गणेश मर्गज यांच्या छायाचित्राची निवड
Edited by: विनायक गावस
Published on: November 11, 2023 14:02 PM
views 560  views

सावंतवाडी : पश्चिम घाट हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे ज्यामध्ये अनेक प्रकारच्या प्रदेशानिष्ठ व दुर्मिळ  प्राण्यांच्या प्रजाती सापडतात. भारतीय डाक विभागाने यावर्षी पश्चिम घाटातील प्रदेशानिष्ठ व संकटग्रस्त प्रजातीतील पक्षी आपल्या पोस्ट कार्डवर प्रकाशित केले. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलांमध्ये काढलेले ग्रे हेडेड बुलबुल ( राखी डोक्याचा बुलबुल ) हा पक्षी भारतीय डाक विभागाने राष्र्टीय डाक सप्ताहाच्या निमित्ताने आपल्या पोस्ट कार्डवर प्रकाशित केला.

या पक्षाचे छायाचित्र श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील प्राणीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. गणेश मर्गज यांनी आपल्या कॅमेरयामध्ये टिपलेले होते. त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब  खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले, विश्वस्त युवराज्ञी उर्वशीराजे भोंसले, युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे संचालक प्रा.डी टी देसाई, सहसंचालक अॅड शामराव सावंत, सौ.अनुराधा घोरपडे, सौ .प्रिया घोरपडे, बेंगलोर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल,महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ग्रे हेडेड बुलबुल हा पक्षी संकटग्रस्त प्रजातीतील असून हा पक्षी फक्त पश्चिम घाटात सापडतो .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरेंद्र डोंगर पांग्रड  बर्ड हाईड कुडाळ, आचरा, तळकट , तिलारी, मळगाव, बांदा  या ठिकाणी सापडतो.हा पक्षी पाहण्यासाठी भारताच्या विविध भागातून पक्षी निरीक्षक व छायाचित्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत असतात.