
कणकवली : मुंबई-गोवा माहामार्गानजीक उभ्या असेलल्या एका खासगी बसला दुचाकीस्वाराने मागाहून धडक दिली. यात दुचाकीस्वार सुरेश संतोष मुणगेकर (२३, रा. बळणे-वरचवाडी) हा जखमी झाला.
हा अपघात बेळणे येथे झाला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारला अवजड वाहनाने धडक दिली. या अपघातात कारचा टायर फुटला. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारचे नुकसान झाले. अपघातांची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद नव्हती.